ऑफलाईन व ऑनलाईन समस्या
समस्यांचे आणखी दोन प्रकार : इंटरनेट येण्यापूर्वी ऑफलाईन युग होते. इंटरनेट आल्यापासून बरेचसे व्यवहार ऑनलाईन होऊ लागले. मात्र तरीही ऑफलाईन जग सुरूच असल्याने त्यामधील ऑफलाईन समस्या सुरूच राहिल्या आहेत. अर्थातच ऑनलाईन समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता समस्यांचे ऑफलाईन व ऑनलाईन समस्या असे आणखी दोन प्रकार आपल्याला विचारात घ्यावे लागतात. यापुढे आपण याबाबत अधिक चर्चा करणार आहोत. ऑफलाईन समस्या : ऑफलाईन समस्या या पूर्वापार चालत आलेल्या व ऑनलाईन जग अस्तित्वात आल्यानंतरही चालू राहिलेल्या समस्या आहेत. ऑफलाईन व्यवहार असतील तोपर्यंत समस्या सुरूच राहतील . ऑफलाईन समस्यांचे वर्गीकरण आपल्याला खालीलप्रमाणे करता येईल. 1. शारीरिक 2. मानसिक 3. मनोकायिक