ब्लॉग विषयी
नमस्कार व मनापासून स्वागत !
समस्या या ब्लॉगवर आपण सर्वांनी मिळून समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू.
समस्या सतत असतातच , पण त्यांचे स्वागत कोण करील ? या ब्लॉगवर मात्र समस्यांचे स्वागत केले जात आहे. हा ब्लॉग समस्यांनाच वाहिलेला आहे. इथे समस्यांबाबत माहिती घेतली जाईल, त्यांचे वर्गीकरण केले जाईल. कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या समस्या अवश्य पाठवाव्यात. या ब्लॉगवर समस्यांचे तूर्त तरी समाधान केले जाणार नाही .जश्या जश्या समस्या इथे गोळा होतील तसा तसा याबाबत निर्णय घेतला जाईल. आता आपण फक्त समस्यांच्या वर्गीकरणनिहाय नोंदी करू. त्यातूनही आपल्याला समस्यांची बरीच कल्पना येईल. काही आपल्या समस्या असतात. काही इतरांच्या असतात. काही समान समस्या असतात. काही निरनिराळ्या समस्या असतात. काही लवकर संपतात. काही दीर्घ काळ राहतात. काही कधीच संपत नाहीत. समस्यांचे असे कितीतरी प्रकार आहेत. त्याबाबत आपण बोलू. मोकळेपणाने बोलू. आपण सुरूवात करीत नाही हीसुद्धा एक समस्याच आहे की ! आपण त्यावर प्रथम मात करू . सुरूवात करणे हीच ती मात आहे !
धन्यवाद.
काळजी घ्या.
कारण, मानवाच्या सर्व समस्यांचे मूळ बव्हंशी मानवी मन, बुध्दी व शरीर यांच्या व्यवहारातच आहे !
Comments
Post a Comment