समस्यांचे प्रकार
समस्या नाहीत हीसुद्धा एक समस्याच आहे !
समस्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत.
१. वैयक्तिक समस्या
२. सामाजिक किंवा सार्वजनिक समस्या
वरील दोन्ही प्रकार एकमेकांशी संबंधित आहेत. वैयक्तिक समस्या अनेक लोकांना लागू होऊन त्यांचे रूपांतर सार्वजनिक समस्यांत होते. अर्थात, या दोहोंचे विवेचन आपण करणार आहोत.
वैयक्तिक समस्या :
वैयक्तिक समस्या ह्या माणसाच्या जन्मापासून निर्माण होत असतात. पुढील आयुष्यातही माणसाला या ना त्या स्वरूपात समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, वैयक्तिक समस्यांचे वर्गीकरण ढोबळ मानाने खालील वयोगटांनुसार करणे योग्य वाटते.
वैयक्तिक समस्यांचे वयोगटांनुसार वर्गीकरण
१. बालकांच्या समस्या
बालकांच्या समस्या ह्या गर्भधारणेपासून सुरू होतात. बालक जन्मानंतर धड रडू, हासू, बोलू, चालू आणि धाऊ लागेपर्यंत त्याच्या समस्या ह्या त्याच्या ताब्यात नसतात. त्यामुळे पालकांनाच त्या सतत लक्ष ठेवून जाणाव्या लागतात.
२. तरूणांच्या समस्या
तरूणाईच्या समस्याही तितक्याच जोमदार आणि उसळत्या स्वरूपाच्या असतात. यांमध्ये १. प्रेमाच्या समस्या व २. अर्थार्जनाच्या समस्या या प्रमुख समस्या असतात. तिसरी समस्या ही आजारांची असते. पण ती सर्वच वयोगटांना लागू असते, हेही तितकेच खरे ! बरेचदा, प्रेम रोग हाच तरूणाईचा मुख्य आजार असतो !!
३. वृद्धांच्या समस्या
असे म्हणतात की , पूर्व जन्माची कर्मेच या जन्मात समोर येतात. त्यात अडचणी किंवा समस्याही असू शकतात. खरे तर, पूर्व जन्म म्हणजे याच जन्मातील बालपण व तरूणपण यांचा काळ. बालपणीची व तरूणपणीची कर्मे हीच या अर्थाने पूर्व जन्मीची कर्मे होत !
वैयक्तिक समस्या ह्या शारीरिक , मानसिक व मनोकायिक या आणखी तीन प्रकारात पहाव्या लागतात. कारण व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अनेक भावभावनांचा आविष्कार असतो. माणसाला अनेक व्यवहारांमधून जावे लागते. त्यातील बऱ्यावाईट अनुभवांमुळे माणसाला काही सवयी जडतात. सवयींचा स्वभाव बनून जातो. चांगल्या सवयी आवश्यक आहेत पण चांगल्या सवयींंचा अतिरेक वाईटच ! स्वतःला , कुटुंबाला व समाजालाही घातक असलेल्या सवयी हया वाईट सवयी असतात. चांगल्या सवयींचा अतिरेक आणि वाईट सवयी ह्यातून अनेक समस्या निर्माण होतात.
निसर्गनिर्मित व मानवनिर्मित समस्या हेही समस्यांचे आणखी दोन प्रकार आहेत. जे आपण पुढे बघूच.
#वैयक्तिक समस्या
#मानसिक समस्या
#कौटुंबिक समस्या
#आरोग्य समस्या
#भावनिक समस्या
#नातेसंबंधातील समस्या
#आर्थिक समस्या
#कार्यक्षेत्रातील समस्या
#शैक्षणिक समस्या
Comments
Post a Comment