Posts

Showing posts from June, 2024

मन, बुध्दी व शरीर यांबाबत थोडेसे अधिक बोलू

आपण यापूर्वीची पोस्ट वाचलीच आहे.  आपली मूळ समस्या  मन, बुध्दी व शरीर आणि  ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे !  इथे आपण थोडा वेगळा विचार करणार आहोत. धर्म व देवता यांच्या पलिकडे जाऊन हया मूळ समस्येचा अधिक विचार करणार आहोत.  म्हणजेच, हे कर्तेकरविते शरीर, मन व बुध्दी हे स्वत:च आहेत का ? हा स्वतंत्र विचार आपण इथे विचारात घेणार आहोत.‌ शरीर मनाचे ऐकते की मन शरीराचे ?  दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास , शरीराची ईच्छा मन मानते की मनाची ईच्छा शरीर मानते ? थेट बोलतो.‌ शरीराचा मनावर परिणाम होतो की मनाचा शरीरावर ? असे दिसते की हे दोन्ही एकमेकांत गुंतलेले पदार्थ आहेत. म्हणजे गुंतागुंत आहे ! ही समस्याच असल्याने ती गुंतागुंतीची असणारच. किंबहुना, ही समस्याच जीवनातील सर्व समस्यांचे निर्मितीकेंद्र असल्याने ती अधिकच गुंतागुंतीची असणार हे उघडच आहे. अर्थात, बहुतेकजण हे इतक्यात मान्य करणार नाहीत. पण आपण मागील लेखातही वाचले आहेच की , आपले शरीर ,मन व बुध्दी यांच्या व्यवहारातून जीवनात अनेक घटना घडतात. त्यात अनेक समस्याही असतात...

मन, बुद्धी, आणि शरीर यांचा संबंध कोणाशी आहे ?

Image
आपल्या सर्व समस्या ह्या आपले मन, बुध्दी व शरीर यांच्या व्यवहारातून निर्माण होतात. त्या सोडवायच्या तर मूळ समस्येचाच विचार करायला हवा. आपली मूळ समस्या  मन, बुध्दी व शरीर आणि  ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे ! म्हणूनच समस्या या ब्लॉगवर ही समस्या विचारात घेतली आहे.  मन, बुध्दी व शरीर यांचा ब्रम्हा,  विष्णू व महेश यांच्याशी काही संबंध आहे का ?   गेली काही वर्षे मनात एक प्रश्न‌ घोळत आहे. मानवी जीवनाचे अनेक गुंते त्याच्याशी निगडीत आहेत. अनेक समस्यांचे मूळ तिथेच आहे. जगात अनेक ठिकाणी मानवी जीवन हे देवादिकांशी जास्त जोडले गेले आहे.‌ काही धर्म रीतीरिवाजात अशा शक्तींना मानले जाते. विशेषत:, हिंदू धर्मात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती निर्मिती, पालनपोषण, नाश व नाशातून पुन्हा निर्मिती यांच्याशी संबंधित आहेत , असे मानले जाते. या तीन शक्तींमार्फत हे सृष्टीचक्र अशाप्रकारे अव्याहतपणे सुरू ठेवण्यात आले आहे, अशी धारणा दिसून येते. या देवतांची निर्मिती मात्र नक्की कशी झाली हा गूढ प्रश्न आहे. जीवनात जे गूढ प्रश्नं आपल्या ...