Posts

मन, बुध्दी व शरीर यांबाबत थोडेसे अधिक बोलू

आपण यापूर्वीची पोस्ट वाचलीच आहे.  आपली मूळ समस्या  मन, बुध्दी व शरीर आणि  ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे !  इथे आपण थोडा वेगळा विचार करणार आहोत. धर्म व देवता यांच्या पलिकडे जाऊन हया मूळ समस्येचा अधिक विचार करणार आहोत.  म्हणजेच, हे कर्तेकरविते शरीर, मन व बुध्दी हे स्वत:च आहेत का ? हा स्वतंत्र विचार आपण इथे विचारात घेणार आहोत.‌ शरीर मनाचे ऐकते की मन शरीराचे ?  दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास , शरीराची ईच्छा मन मानते की मनाची ईच्छा शरीर मानते ? थेट बोलतो.‌ शरीराचा मनावर परिणाम होतो की मनाचा शरीरावर ? असे दिसते की हे दोन्ही एकमेकांत गुंतलेले पदार्थ आहेत. म्हणजे गुंतागुंत आहे ! ही समस्याच असल्याने ती गुंतागुंतीची असणारच. किंबहुना, ही समस्याच जीवनातील सर्व समस्यांचे निर्मितीकेंद्र असल्याने ती अधिकच गुंतागुंतीची असणार हे उघडच आहे. अर्थात, बहुतेकजण हे इतक्यात मान्य करणार नाहीत. पण आपण मागील लेखातही वाचले आहेच की , आपले शरीर ,मन व बुध्दी यांच्या व्यवहारातून जीवनात अनेक घटना घडतात. त्यात अनेक समस्याही असतात...

मन, बुद्धी, आणि शरीर यांचा संबंध कोणाशी आहे ?

Image
आपल्या सर्व समस्या ह्या आपले मन, बुध्दी व शरीर यांच्या व्यवहारातून निर्माण होतात. त्या सोडवायच्या तर मूळ समस्येचाच विचार करायला हवा. आपली मूळ समस्या  मन, बुध्दी व शरीर आणि  ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे ! म्हणूनच समस्या या ब्लॉगवर ही समस्या विचारात घेतली आहे.  मन, बुध्दी व शरीर यांचा ब्रम्हा,  विष्णू व महेश यांच्याशी काही संबंध आहे का ?   गेली काही वर्षे मनात एक प्रश्न‌ घोळत आहे. मानवी जीवनाचे अनेक गुंते त्याच्याशी निगडीत आहेत. अनेक समस्यांचे मूळ तिथेच आहे. जगात अनेक ठिकाणी मानवी जीवन हे देवादिकांशी जास्त जोडले गेले आहे.‌ काही धर्म रीतीरिवाजात अशा शक्तींना मानले जाते. विशेषत:, हिंदू धर्मात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती निर्मिती, पालनपोषण, नाश व नाशातून पुन्हा निर्मिती यांच्याशी संबंधित आहेत , असे मानले जाते. या तीन शक्तींमार्फत हे सृष्टीचक्र अशाप्रकारे अव्याहतपणे सुरू ठेवण्यात आले आहे, अशी धारणा दिसून येते. या देवतांची निर्मिती मात्र नक्की कशी झाली हा गूढ प्रश्न आहे. जीवनात जे गूढ प्रश्नं आपल्या ...

व्हिडीओंमधून सामाजिक समस्या

Image
  सामाजिक समस्यांपैकी अनेक समस्यांची सुरूवात व्यक्तिगत वा कौटुंबिक समस्यांमधून झालेली आढळते.  अशाच काही  समस्या devidaspatilcreation या यू ट्यूब   चॅनेलवरील Family and Social Problems या  playlist मधील व्हिडीओंमधून.  #video #family_problems #social_problems #youtube #youtubeshortsvideo #shorts @devidaspatilcreation #devidaspatilchannel

ऑफलाईन व ऑनलाईन समस्या

  समस्यांचे आणखी दोन प्रकार : इंटरनेट येण्यापूर्वी ऑफलाईन युग होते. इंटरनेट आल्यापासून बरेचसे व्यवहार ऑनलाईन होऊ लागले. मात्र तरीही ऑफलाईन जग सुरूच असल्याने त्यामधील ऑफलाईन समस्या सुरूच राहिल्या आहेत. अर्थातच ऑनलाईन समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता समस्यांचे ऑफलाईन व ऑनलाईन समस्या असे आणखी दोन प्रकार आपल्याला विचारात घ्यावे लागतात.‌ यापुढे आपण याबाबत अधिक चर्चा करणार आहोत.‌  ऑफलाईन समस्या :    ऑफलाईन समस्या या पूर्वापार चालत आलेल्या व ऑनलाईन जग अस्तित्वात आल्यानंतरही चालू राहिलेल्या समस्या आहेत. ऑफलाईन व्यवहार असतील तोपर्यंत   समस्या सुरूच राहतील .   ऑफलाईन समस्यांचे वर्गीकरण  आपल्याला  खालीलप्रमाणे करता येईल. 1. शारीरिक   2. मानसिक   3. मनोकायिक

समस्यांचे प्रकार

समस्या नाहीत हीसुद्धा एक समस्याच आहे ! समस्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत.‌   १. वैयक्तिक समस्या २. सामाजिक किंवा सार्वजनिक समस्या       वरील दोन्ही प्रकार एकमेकांशी संबंधित आहेत. वैयक्तिक समस्या अनेक लोकांना लागू होऊन त्यांचे रूपांतर सार्वजनिक समस्यांत होते. अर्थात, या दोहोंचे विवेचन आपण करणार आहोत.‌ वैयक्तिक समस्या :               वैयक्तिक समस्या ह्या माणसाच्या जन्मापासून निर्माण होत असतात. पुढील आयुष्यातही माणसाला या ना त्या स्वरूपात समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, वैयक्तिक समस्यांचे वर्गीकरण ढोबळ मानाने खालील वयोगटांनुसार करणे योग्य वाटते.  वैयक्तिक समस्यांचे वयोगटांनुसार वर्गीकरण १. बालकांच्या समस्या बालकांच्या समस्या ह्या गर्भधारणेपासून सुरू होतात. बालक जन्मानंतर धड रडू, हासू, बोलू, चालू आणि धाऊ लागेपर्यंत त्याच्या समस्या ह्या त्याच्या ताब्यात नसतात. त्यामुळे पालकांनाच त्या सतत लक्ष ठेवून जाणाव्या लागतात.‌  २. तरूणांच्या समस्या तरूणाईच्या समस्याही तितक्याच जोमदार आणि उसळत्या स्वरूपाच्या असतात. यांमध्ये १. प्र...

समस्यांचे स्वागत

        समस्यांचे स्वागत   हे या पोस्टचे शीर्षक पाहून तुम्हांला आश्चर्य वाटले असेल ! खरे तर त्याआधी सर्व समस्याग्रस्तांचे  स्वागत करायला  हवे होते. ते तर आहेेच आहे ! कारण,  त्यांच्यामुळेच तर आपल्याला  समस्या  कळणार आहेत . समस्या सतत असतातच , पण त्यांचे स्वागत कोण करील ?  या ब्लॉगवर मात्र समस्यांचे स्वागत केले जात आहे. हा ब्लॉग समस्यांनाच वाहिलेला आहे.‌ इथे समस्यांबाबत माहिती घेतली जाईल, त्यांचे वर्गीकरण केले जाईल.‌‌ कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या समस्या अवश्य पाठवाव्यात. या ब्लॉगवर समस्यांचे तूर्त तरी समाधान केले जाणार नाही .‌‌ जश्या जश्या समस्या इथे गोळा होतील तसा तसा याबाबत निर्णय घेतला जाईल . आता आपण फक्त समस्यांच्या  वर्गीकरणनिहाय नोंदी करू.‌ त्यातूनही आपल्याला समस्यांची बरीच कल्पना येईल. हे वाचूनही काहींना त्यांच्या समस्यांचे अधिक चांगल्याप्रकारे आकलन होऊन समस्या सुटण्यास मदतच होईल .  काही आपल्या समस्या असतात. काही इतरांच्या असतात.‌ काही समान समस्या असतात. काही निरनिराळ्या समस्या असतात. काही लवकर संपतात. काही दीर्घ काळ र...